फलटण चौफेर दि २५ जून २०२५
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण २१ जागांपैकी १२ उमेदवार विजयी ठरले असून, निकालाच्या पार्श्वभूमीवर माळेगावमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला.
कारखान्याच्या आवारात आणि परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत फटाके फोडले, गुलाल उधळला व ढोल-ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांचे स्वागत केले. सर्व विजयी सदस्यांचे अभिनंदन करत त्यांच्यासोबत सामूहिक छायाचित्र घेण्यात आले. परिसर गुलाबी गुलालात न्हाऊन निघाला होता.
विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे
'ब' गट प्रतिनिधी ना. अजितदादा पवार – विजयी भटक्या विमुक्त जाती राखीव विलास देवकाते – विजयी, अनुसूचित जाती राखीव रतनकुमार भोसले – विजयी, इतर मागासवर्गीय राखीव,नितीनकुमार शेंडे – विजयी,महिला राखीव संगीता कोकरे – विजयी,ज्योती मुलमुले – विजयी, माळेगाव गट – 1 शिवराज जाधवराव – विजयी, राजेंद्र बुरुंगळे – विजयी बाळासाहेब भाऊ तावरे – विजयी, पणदारे गट – 2योगेश जगताप – विजयी, तानाजी कोकरे – विजयी,स्वप्नील जगताप – विजयी अजून उर्वरित मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे